पुणे : पुणेकरांसाठी आता आनंदाची बातमी आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये पुणेकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागत होते. पुणे लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर देखील पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. मात्र, आता धरणसाखळीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने णि हवामान खात्याने दिलेला जास्त पावसाचा अंदाज यामुळे तूर्तास पाणीकपात होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी सांगितले आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत पाऊस कमी झाला होता म्हणून शहरात पाण्याचे पाणी कपात करण्यात येत होती. पाणी कपातीची ही टांगती तलवार पुणेकरांच्या माथी कायम होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार असल्याने पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर जनमानसावर परिणाम होईल, असा कोणतेही निर्णय घेतला जाणार नसल्याचे समजते. आपत्ती व्यवस्थापनाबाबत शुक्रवारी १७ मे रोजी झालेल्या विभागीय बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या खडकवासला धरणात ६.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज १ हजार ४८५ एमएलडी पाणी उपसा करते. म्हणजेच महिन्याला १.६२ टीएमसी पाणी पुणे शहराला लागते. हे गणित लक्षात घेता धरणात आणखी ३ महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्यातून दौंडला दीड टीएमसी पाणी पिण्यासाठी दिले जाणार आहे. तसेच यामध्ये बाष्पीभवनामुळे अर्धा टीएमसी पाणी वाया जाईल, असे सांगण्यात आले आहे. या सोबतच पालखी सोहळ्यासाठी अर्धा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. ०.८४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात राज्य शुल्क विभागाची मोठी कारवाई; शहरात बनावट दारुसह इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त
-कतरिना कैफ होणार आई..?; कतरिनाच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा
-शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं ओरबाडला; केळी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान
-उद्धव ठाकरेंना धक्का: पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार