पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर आहे. पुणे शहरातही विविध भागात गाड्या आणि मोठी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी धडक कारवाई करण्यात येत आहे. आणि मुद्देमाल जप्त करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही शहरात अनेक कारवाया केल्या. त्यातच आता राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाने परदेशी बनावट दारुसह तब्बल ११ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ब्रम्हा सनसिटी जवळील, एफ प्लाझा बिल्डींगचा गाळा क्र. जी ५५, वडगाव शेरी मध्ये छापा घालून परदेशी बनावटीच्या मद्यासह ११ लाख ५४ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उच्च प्रतीच्या परदेशी बनावटीच्या आयात विदेशी मद्याच्या वेगवेगळया ब्रॅण्डच्या व क्षमतेच्या ३६ सीलबंद बाटल्या, एक होंडा कंपनीची अमेझ मॉडेलची चारचाकी कार तसेच एक होंडा कंपनीची ॲक्टिव्हा दुचाकी वाहन आणि मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ५४ हजार ५२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतरांचा शोधही सुरु आहे.
अवैध दारु निर्मिती, वाहतूक व विक्री व्यवसायाशी संबंधीत माहिती निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे यांचे सह निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क ए विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर यांच्या पथकांचा सहभाग होता.
महत्वाच्या बातम्या-
-कतरिना कैफ होणार आई..?; कतरिनाच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा
-शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं ओरबाडला; केळी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान
-उद्धव ठाकरेंना धक्का: पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
-दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल