Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा चाहता वर्ग काही कमी नाही. कतरिनाने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यातच कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये लग्न केले. त्यानंतर कतरिना आणि विकी या दोघांचा चाहता वर्ग आणखीच वाढला. तसेच सोशल मीडियावर हे दोन्ही कलाकार चांगलेच चर्चेत राहिले आहेत. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग लग्न केले. त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
विकी कौशलचा काल ३६ वा वाढदिवस होता. विकी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनमध्ये पोहचला. यावेळी कतरिनाने काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये विकी हा एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसतो आहे. हे फोटो शेअर करत कतरिना कैफ हिने तीन पांढऱ्या रंगाच्या इमोजी देखील शेअर केल्या आहेत.
View this post on Instagram
कतरिनाने शेअर केलेल्या पोस्टवर विविध चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी थेट कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे. लोक सतत या पोस्टवर कमेंट करत आहेत. एकाने म्हटले की, या इमोजीनंतर हे नक्की आहे की, यांची फॅमिली वाढत असून तिसऱ्या व्यक्तीचे यांच्या कुटुंबात आगमन होत आहे. दुसऱ्याने लिहिले की, नक्कीच कतरिना कैफ ही प्रेग्नंट आहे.
तिसऱ्याने लिहिले की, विकीच्या बर्थडेच्या दिवशी कतरिनाने चाहत्याना मोठी हिंट नक्कीच दिली आहे. लवकरच यांच्या कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन होणार आहे. दरम्यान, कतरिनाच्या या पोस्टवरुन अनेक चर्चांना उधाण आले असून तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं ओरबाडला; केळी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान
-उद्धव ठाकरेंना धक्का: पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे; लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
-दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर; वाचा कसा पाहता येणार निकाल
-उन्ह्याळ्यात पडणारा पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट? वाचा ही महत्वाची बातमी
-संजय काकडेंच्या अडचणीत वाढ, थेट झाले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी