Health Update : राज्यात कडाक्याच्या उन्हाने सर्वांनाच हैराण केले आहे. मार्च, एप्रिलमध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार केला होता. त्यातच गेल्या काही दिवसापासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सर्वसाधारणपणे मागच्या दशकापासून ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये अनेक भागात वातावरणात थंडावा जावणते आणि पाऊस पडतो. हाच अवकाळी पाऊस आपल्यासाठी चांगला की वाईट हे आपण जाणून घेणार आहोत.
अंदाजे ३ ते साडेतीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये उन्हाळ्यात पडणार्या पावसाचा उल्लेख आहे. याचाच अर्थ प्राचीन काळापासून ग्रीष्म ऋतूमध्येसुद्धा पाऊस पडत असावा. या तापमानाच्या चढउतारामुळे अनेक जण आजारी पडतात. वातावरणातील बदलाचे अनेकांवर परिणाम होतात.
आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे अशाप्रकारे जो ऋतू सुरु आहे त्या ऋतूऐवजी भलत्याच ऋतूची लक्षणे दिसणे हा काळाचा मिथ्यायोग म्हटला जातो. मिथ्या म्हणजे चूक अर्थात ग्रीष्म ऋतूमध्ये उन्हाळ्याची अपेक्षा आहे, पावसाची नाही. असे असतानाही ग्रीष्मातल्या उन्हाळ्यात पाऊस पडला तर ती काळाची चूक आहे, जी आरोग्यास हानिकारक आणि रोगांना आमंत्रण देणारी ठरते, असे आयुर्वेदात सांगितले जाते.
भर उन्हाळ्यामध्ये वातावरण थंड होणे किंवा पाऊस पडणे हे आपल्यासाठी पूरक नाही. असा अवकाळी पडलेला पाऊस हा वातावरणात अचानक बदल करुन विषाणूंचा फैलाव करतो. विषाणूजन्य संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्यास कारणीभूत होतो, तसाच अवकाळी पाऊस शेतीसाठीसुद्धा धोकादायक ठरतो आणि पिकाचे तसेच पर्यायाने आपले पोट भरणार्या शेतकर्याचे सुद्धा नुकसान करतो.
अपेक्षित ऋतूच्या विपरित ऋतू लक्षणे दिसणे म्हणजे मिथ्यायोग. याचे निसर्गावर आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, असे निश्चित मत प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त करुन अशा काळामध्ये अनेक जण आजारी पडण्याचे तसेच संसर्गजन्य आजार सर्वत्र फैलावण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे अशा काळात सावधगिरीच्या सूचनाही दिल्या जातात.
महत्वाच्या बातम्या-
-संजय काकडेंच्या अडचणीत वाढ, थेट झाले अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
-अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चेला पूर्णविराम; अजितदादांची प्रकृती बिघडली
-Pune | उरुळी देवाची अन् फुरसुंगीत ८४ अनधिकृत होर्डिंग; गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
-पुण्याहून थेट कर्नाटकच्या कत्तलखान्यात उंटांची तस्करी; पुणे पोलिसांकडून ८ उंटांना जीवदान
-पीएमआरडीएकडे अनधिकृत होर्डिंग हटवण्यासाठी निविदा; कारवाईसाठी पहावी लागणार वाट