पुणे : मुंबईमधील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेवरुन पुणे आणि पिंपरी-चिंचवड प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग काढण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अनेक पालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई देखील करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत होर्डिंगबाबत स्वतंत्र पथक कार्यान्वित आहेत. या अंतर्गत येणाऱ्या ८५० पेक्षा जास्त गावांतील अशाप्रकारे अनधिकृत होर्डिंग्ज, फलक, फ्लेक्स हटवण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी न मिळाल्याने खुली करता आली नाही. पीएमआरडीए हद्दीतील धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. पण आता ही निविदा खुली करण्यासाठी राज्याच्या नगरविकासाकडून मंजुरी मागवण्यात आली आहे. त्यामुळे यावरील कारवाईसाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
अनधिकृत होर्डिंग व फ्लेक्स हटवण्यासाठी पीएमआरडीएकडून ठेकेदार नियुक्त करण्यात येणार आहे. त्यानुसार निविदा मागवण्यात आल्या. गेल्या चार महिन्यांत दोनदा निविदा प्रसिद्ध केली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा निविदा मागवली. त्याला प्रतिसाद मिळून तीन निविदाधारक पात्र झाले. आचारसंहिता लागू झाल्याने निविदा खुल्या करता आल्या नाहीत.
“अनधिकृत होर्डिंगवर कारवाईसाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. याबाबत आता नगरसचिवांकडे मार्गदर्शनाबाबत पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात येईल”, असं पीएमआरडीएमधील विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकर सुनील मरळे सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऊन सावलीच्या खेळात पुणेकर हैराण; शहराच्या तापमानात पुन्हा होतेय वाढ
-अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण
-घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान
-संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट