मुंबई : राज्यात सेना-भाजपची युती तुटल्यापासून सेना-भाजपचा एकेमेकांवर टीका, आरोप करण्याचं सत्र काही थांबलेलं दिसत नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही अशी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना भाजप आणि संघावर सडकून टीका केली. यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत जोरदार पलटवार केला आहे.
“परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय”, अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ही पोस्ट केली आहे.
“आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत. उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक कविताही पोस्ट केली आहे.
परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण… pic.twitter.com/csD9sFAvmG
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 17, 2024
हमारा॥
भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ऊन सावलीच्या खेळात पुणेकर हैराण; शहराच्या तापमानात पुन्हा होतेय वाढ
-अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण
-घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान
-संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट
-पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांचीच वाहने चोरी; सर्वसामान्यांच्या वाहन सुरक्षिततेचं काय?