पुणे : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून उन्हाचा पारा वाढतच होता. मात्र गेल्या काही दिवस राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत थंडावा जाणवत आहे. मात्र पुणे शहरात आणि परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव आता कमी झाला असला तरीही उन्हाचा चटका पुन्हा वाढताना दिसत आहे.
शहरात गेल्या ३ दिवसापासून कमाल तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे, शहरात ३७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ढग निरभ्र झाल्याने पुढील ३ दिवस पुन्हा कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
शनिवारी (११ मे) आणि रविवारी (१२ मे) रोजी सलग २ दिवस शहरात जोरदार पाऊस झाला. परिणामी, शहराचे कमाल तापमान – जे पूर्वी चाळीशी पार केले होते ते तापमान चांगलेच घसरले आणि ३१ अंश सेल्सिअस झाले. गेल्या २-३ दिवस झालेल्या पावसामुळे पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला होता पण आता पुन्हा तापमानात वाढ झाली. लोहगाव येथे ३६ अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर येथे ३७.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहरात गुरुवारी १६ मेरोजी दुपारपर्यंत प्रामुख्याने आकाश निरभ्र होतं, ढगाळ वातावरण होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवारी १७ मे आणि शनिवारी १८ मे रोजी पुण्यात कमाल तापमानात ३९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होईल, तर रविवारी १९ मे तापमान ४० अंशसेल्सिअसपर्यंत पोहचू शकते असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार नॉट रिचेबल; महायुतीत नाराज असल्याच्या चर्चेला उधाण
-घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान
-संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट
-पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांचीच वाहने चोरी; सर्वसामान्यांच्या वाहन सुरक्षिततेचं काय?