पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय खेळीचा अंदाज सर्वांनाच आहे. त्यांच्या राजकारणाची चर्चा सर्वत्र आहे. अजित पवार हे नॉट रिचेबल झाले आहेत, त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक दिवसांमध्ये प्रचारादरम्यान काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्याने अजित पवार टीकेचे धनी ठरले होते.
गेल्या २ दिवसांपासून अजित पवार निवडणूक प्रचारतही सहभागी नसल्याचे स्पष्ट दिसत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथे सभा झाली. या सभेलाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थितीत होते. मात्र अजित पवार कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज भरला तेव्हाही अजित पवार गैरहजर होते. यावेळी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल वाराणसीत पोहोचले होते. त्यामुळे, अजित पवार नेमके आहेत तरी कोठे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यावर, अजित पवारांची तब्बेत बरी नसल्याने गैरहजर राहिल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र, अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-घाटकोपरनंतर आता मोशीमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे मोठे नुकसान
-संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट
-पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांचीच वाहने चोरी; सर्वसामान्यांच्या वाहन सुरक्षिततेचं काय?