पुणे : मुंबईच्या घाटकोपर भागातील एक होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे पडले. या दुर्घटनेमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला तर ७० ते ८० जण जखमी आहेत. ही दुर्घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मोशीमध्ये दुपारी साडोचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागामध्ये पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये वादळी वाऱ्यामुळे जय गणेश साम्राज्य चौकातील होर्डिंग पडल्यामुळे ४ दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच हे होर्डिंग रस्त्यावर पडले नसल्याने वाहतुकीला कोणतीही अडचण आली नाही. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये देखील अशाच प्रकारचे होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना झाली होती. यामध्ये ५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगबाबत माहिती घेण्यात येते. मात्र त्यावर कारवाई केल्याची माहिती समोर आली नाही.
घाटकोपरमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे पुणे महापालिका प्रशासनही अलर्ट झाले असून शहरातील अनेक अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. रमेश भोसले यांनी दिले आहेत. तसेच ‘जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील’, असा सज्जड दम देखील डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट
-पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांचीच वाहने चोरी; सर्वसामान्यांच्या वाहन सुरक्षिततेचं काय?
-सावधान! पुण्यात डेंग्यूचा धोका वाढतोय; वाचा काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?