पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरात वाहन चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही चोरी करणाऱ्यांची टोळी वाहन चोरी करुन ते दुसऱ्या शहरात विकत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरूनच पोलिसांच्या दुचाकी चोरी केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
चोरी झालेल्या वाहनांचा शोध पुणे पोलिसांकडून मोठे प्रयत्न करुन घेतला जायचा. मात्र आता आयुक्तालयासमोरुनच वाहन चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांच्याच दुचाकी चोरी गेल्याने आता पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच आव्हान निर्माण झाले आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या दुचाकी पार्क केल्या होत्या. या तिघांच्याही दुचाकी चोरीला गेल्याचे आता समोर आले असल्यामुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या तिघांपैकी एक वाहन पुण्यातील एका भागात सापडले आहे. तसेच याप्रकरणी मात्र पोलिसात गुन्हा दाखल नाही आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या पार्किंगमधून चोरीला गेलेल्या वाहनांमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या अडीच महिन्याच्या काळात चोरट्यांनी तब्बल ४०० वाहने चोरी केली आहेत. त्यांची किंमत जवळपास १ कोटी ५१ लाख ८४ हजार रुपयांच्या घरात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! पुण्यात डेंग्यूचा धोका वाढतोय; वाचा काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?