पुणे : गेल्या दिवसांपासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी वाऱ्यामुळे मुंंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७० ते ८० जण जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने धसका घेतला आहे. शहरात अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांना पुणे महापालिकेने चांगलाच हिसका दाखवला आहे. पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अनधिकृत होर्डिंग्ज पुढील ७ दिवसात काढून टाकण्याचे आदर्श दिले आहेत.
‘जे कारवाई करणार नाहीत त्यांना परिणाम भोगावे लागतील’, असा सज्जड दम देखील डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. महापालिका आयुक्त यांनी स्वतः पुण्यातील रस्त्यावर फिरून या होर्डिंग्जचा आढावा घेतला आहे. पुण्यात जवळपास २ हजार ५९८ होर्डिंग्ज आहेत. त्यापैकी अनेक होर्डिंग नियमबाह्य असून असा त्यामुळे यावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र काही होर्डिंग उतरवत असताना कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
पुण्यातील खंडोजी बाबा चौकातील अनधिकृत होर्डिंग्स काढायला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात शहराती अनेक ठिकाणी असलेली होर्डिंग्स काढण्यात येणार आहेत. पुण्यातील जाहिरात होर्डिंग्जबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागितला आहे. पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग्सचा अहवालही मागवण्यात आला आहे. परवानगी देण्यात आलेल्या सर्व जाहिरात पालकांचे स्थापत्य विषयक लेखापरीक्षण नव्याने करून घेण्यास संबंधित जाहिरात फलक धारकाला कळवण्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बळीराजासाठी आनंदाची बातमी! ३१ मे लाच मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती?
-भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांची प्राणज्योत मालवली
-होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकल मागे