पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी. पुणे आणि पुण्याचे ट्राफिक हा विषय आता चांगलाच चर्चेचा बनला आहे. शहरात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामामुळे शहरात विविध भागात चांगलेच ट्राफिक असते. येत्या शुक्रवारपासून म्हणजेच १७ मेपासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील काही वाहतुकीत बदल केले आहेत.
तुम्ही जर रोज शिवाजीनगरचा रस्ता येण्या-जाण्यासाठी वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. शहरातील शिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनसाठी गर्डर टाकण्याचे काम करायचे असल्याने वाहतूक शाखेने वाहतूकीत बदल केले आहेत. शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत हे बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आले आहेत. यादरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.
- वीर चापेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार (पर्यायी मार्ग चापेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने
- सर्व्हिस रस्त्यावरून चापेकर चौक – डावीकडे वळण घेऊन न. ता. वाडी – उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक)
- फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चापेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
- न. ता. वाडी चौक ते चापेकर चौक प्रवेश बंद राहील.
- स. गो. बर्वे चौकाकडून येऊन सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे प्रवेश बंद राहील.
- शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून येऊन एसटी स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.
- सिमला ऑफिस चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसीकडील बाजूने जाऊन चापेकर उड्डाणपुलावरून जावे.
- वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.
वीर चापेकर चौक ते न. ता. वाडी, के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक, हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. या मेट्रोच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा समस्यांना पुणेकांना तोंड द्यावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बळीराजासाठी आनंदाची बातमी! ३१ मे लाच मान्सून केरळमध्ये, महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती?
-भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांची प्राणज्योत मालवली
-होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकल मागे