पुणे : यंदा देशात मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील शेतकरीराजा आता यंदा लवकरच सुखावणार असल्याचे स्पष्ट संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. देशामध्ये मान्सूनचे आगमन यंदा लवकर होणार आहे.
यंदा ३१ मेपासून मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरी पेक्षा जास्त पावसाचा यंदा शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील पूर्वानुमान अंदाजाची माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. राज्यातही चांगला पाऊस असणार आहे. मात्र, पुढील काही दिवस उष्णता वाढणार असल्याने लोकांनी काळजी घेण्याचे आवहान पुणे हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात जगभरातील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदविले गेले आहे. राज्यात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि असह्य झाल्या आहेत. जागतिक तापमान वाढ सलग ११ महिने कायम राहिली, असल्याचे निरीक्षण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) नोंदविले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांची प्राणज्योत मालवली
-होऊ दे खर्च! लोकसभेला खर्च करण्यात बारणेंची आघाडी, सर्व उमेदवारांना टाकल मागे
-गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?