पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी १३ मे रोजी पार पडले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची मतदान झाल्याची टक्केवारी आता समोर आली आहे. पुणे मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुण्यात झालेल्या मतदानातून महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईमध्ये पुण्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता मतदान झाल्यानंतर अंतिम आकडेवारी समोर आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सोमवारी सकाळी ७ वा. पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ५३.५४ टक्के मतदान पार पडले आहे. सर्वात जास्त मतदान हे कसबा पेठमधून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे एकूण मतदान- ५३.५४ टक्के
वडगाव शेरी- ५१.७१%
शिवाजीनगर- ५०.६७%
कोथरुड – ५२.४३%
पर्वती ५५.४७%
पुणे कॅन्टोन्मेंट ५३.१३%
कसबा पेठ ५९.२४%
पुणे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय मतदार संघात झालेल्या मतदानाची संख्या
वडगाव शेरी – २ लाख ४१ हजार ८१७
शिवाजीनगर – १ लाख ४१ हजार १३३
कोथरूड – २ लाख १७ हजार ४५५
पर्वती – १ लाख ८९ हजार १८४
पुणे कॅन्टोन्मेंट – १ लाख ४९ हजार ९८४
कसबा पेठ – १ लाख ६४ हजार १०५
महत्वाच्या बातम्या-
-गाड्यांच्या आकर्षक नंबरसाठी जाणून घ्या कशी असणार आरटीओची लिलाव प्रकिया?
-मतदानापूर्वी पोलीस ठाण्यात राडा; रवींद्र धंगेकरांसह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
-जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो
-एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, मावळात एकूण मतदान किती? फायनल आकडा आला