पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी रविवारी १२ मे रोजी महाविकास आाडीचे उमेदवा रवींद्र धंगेकर यांनी भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करुन सहकारनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोल केले होते. ठिय्या आंदोलन करणे रवींद्र धंगेकर यांना चांगलेच महागात पडले आहे. सहकारनगर पोलिसांनी धंगेकर यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. तक्रार करुन देखील पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचे सांगत धंगेकर यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलीस अंमलदार अभिजीत तुकाराम बालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रवींद्र धंगेकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावरुन नितीन मधुकर कदम, रवींद्र धंगेकर, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडीत, अनिल सातपुते व इतर 35 ते 40 जणांवर आयपीसी 143, 145, 149, 188 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, लोकप्रतिनीधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.जमावबंदीचे उल्लंघन करत आंदोलन केल्याप्रकरणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या ३०-४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो
-एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, मावळात एकूण मतदान किती? फायनल आकडा आला
-आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले अन् मगच प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल
-पत्नी नांदायला येईना, पठ्याने दिली अख्या शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं काय घडलं?