पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईला चांगलाच फटका बसला आहे. घाटकोपर येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर भले मोठे होर्डिंग लावण्यात आले होते. वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले. या अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ जण जखमी आहेत. याच अपघाताचा पुणे महापालिका प्रशासनाने धसका घेतला आहे.
पुण्यात अशा कोणत्याही प्रकारचा पुण्याला फटका बसू नये म्हणून पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. पुणे शहरात एकूण १ हजार ५६४ अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. शहरतील सगळया होर्डिंगस ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. शहरात एकूण २ हजार ५०० होर्डिंग्स आहेत.
महापालिका प्रशासनाकडून सगळ्या होर्डिंग्सची माहिती घेण्याचं काम सुरु आहे. जर अनधिकृत असेल तर त्याच लायसन्स रद्द करून कारवाई करणार आहेत. जे नीट नाहीत आणि धोकादायक आहेत. त्यावर कारवाई करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. २ हजार ५०० परवानग्या आहेत. मात्र काही अनधिकृत होर्डिंग्सही आहेत. त्यामुळे त्यांची सगळी चौकशी करण्याचे काम सुरु आहे.
शहरात कोणतेही होर्डिंग अनधिकृत असेल तर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. २ हजार ५९८ अधिकृत होर्डिंग्स आहेत. शहरात फक्त ८५ अनधिकृत होर्डिंग्स आहेत. त्यात हडपसरमध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत होर्डिंग्स आहेत. २ हजार ३०० होर्डिंगसचे ऑडिट झाले असून आतापर्यंत एकूण १ हजार ५६४ अनधिकृत होर्डिंग्सवर पुणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जादूटोण्याच्या नावाखाली महिलेला १५ लाखांचा गंडा; गुंगीचे औषध पाजत मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो
-एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला, मावळात एकूण मतदान किती? फायनल आकडा आला
-आधी मतदानाचे कर्तव्य पार पाडले अन् मगच प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल
-पत्नी नांदायला येईना, पठ्याने दिली अख्या शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं काय घडलं?
-कर्वे रोड ते कर्तव्यपथ! मतदान संपताच लागले मोहोळांचे ‘खासदार’ म्हणून फ्लेक्स