पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडले. या मतदान प्रक्रियेत सुजान नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रसुतीसाठी चाकण येथील माहेरी गेलेल्या गर्भवती महिलेने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी या महिलेसाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केल्याने या महिलेला शिवाजीनगर मतदारसंघातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक प्रशासनाने मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिलांना सुलभरित्या मतदानाचा हक्क बजावता आला आहे.
चाकण येथील शालू राठोड असं या मतदार महिलेचे नाव आहे. त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत होते. प्रसुतीची तारीख १४ मे असल्याने त्यांना १३ तारखेला रुग्णालयात दाखल व्हायचे होते. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांनी मतदान करण्याची इच्छा प्रशासनाकडे व्यक्त केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी राठोड यांच्या प्रवासाची सोय करण्याच्या सूचना दिल्या.
दिवसे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी राठोड यांच्यासाठी चाकण ते शिवाजीनगर या प्रवासासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यामुळे राठोड यांनी दुपारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात त्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पत्नी नांदायला येईना, पठ्याने दिली अख्या शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं काय घडलं?
-कर्वे रोड ते कर्तव्यपथ! मतदान संपताच लागले मोहोळांचे ‘खासदार’ म्हणून फ्लेक्स
-‘माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेय’- प्रवीण तरडे
-मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट
-पुण्यात 8 तासात तब्बल 34.07 टक्के मतदान; पुणेकरांची मतदान करण्यासाठी लगबग