पुणे : एकीकडे लोकसभा निवडणुकीचे पुणे शहरात मतदान सुरु होते तर दुसरीकडे एका पठ्ठ्याने पुणे शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पठ्ठ्याने थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन ही धमकी दिली आहे. या पठ्ठ्याच्या धमकीचे कारण ऐकले तर तुम्हालाही हसू आवरणार नाही.
पुणे पोलिसांना आलेल्या या धमकीच्या फोन कॉलमुळे बंदोबस्तात असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाल्याचंही पहायला मिळालं आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तेव्हा त्या पठ्ठ्याने धमकी देण्याचं कारण सांगितलं की, पत्नी नांदायला येत नसल्याने रागाच्या भरात नियंत्रण कक्षाला फोन करुन पुणे शहराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे त्याने सांगितले.
पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून दिशाभूल केल्याप्रकरणी एकाविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाचा पत्नीशी वाद झाला होता. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नी नांदायला येत नसल्याने त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सोमवारी दुपारी दूरध्वनी केला. शहरात ७ ठिकाणी बाॅम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याची धमकी त्याने नियंत्रण कक्षाला दिली.
नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. याबाबतची माहिती बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कळविण्यात आली. मतदानाच्या बंदोबस्तात गुंतलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने तपास केला. तांत्रिक तपासात दूरध्वनी करणाऱ्याचे नाव निष्पन्न झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कर्वे रोड ते कर्तव्यपथ! मतदान संपताच लागले मोहोळांचे ‘खासदार’ म्हणून फ्लेक्स
-‘माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेय’- प्रवीण तरडे
-मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट
-पुण्यात 8 तासात तब्बल 34.07 टक्के मतदान; पुणेकरांची मतदान करण्यासाठी लगबग
-पिंपरी-चिंचवडमध्ये कमी मतदान; मावळ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान झाले?