पुणे : राज्यात पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर प्रविण तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे कौतुक केले.
“आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्यात. जी गर्दी झाली आहे, ते पाहून मला पहिल्यांदा आनंद झालेला आहे. पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहणे, आम्ही सेलिब्रेट केले. पुण्याचे संस्कार आणि पुण्याची संस्कृती ही या रांगांमधून दिसली. मुरलीधर मोहोळ मावस माझा भाऊ आहे. नात्यागोत्यातला माणूस जर उभा असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे माझ्या शिकल्या सवरलेल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेलो आहे. त्याच्यासाठी प्रचार केला, असे प्रविण तरडेंनी म्हणाले आहेत.
‘आताची निवडणूक ही लोकशाहीची निवडणूक आहे. माझ्या घरातला तुटलेला नळ त्या खासदाराने येऊन दुरुस्त करावा अशी माझी अपेक्षा नाही. मी खासदार देशासाठी, देशांच्या सुरक्षित सीमांसाठी, देशातील उत्तम उत्तम कायद्यांसाठी निवडून देत आहे. मतदानाची सुट्टी घेऊन ट्रीप एन्जॉय करायला गेलेल्या प्राण्यांबद्दल न बोललेलं बरं, असेही प्रविण तरडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट
-पुण्यात 8 तासात तब्बल 34.07 टक्के मतदान; पुणेकरांची मतदान करण्यासाठी लगबग
-पिंपरी-चिंचवडमध्ये कमी मतदान; मावळ मतदारसंघात आतापर्यंत किती टक्के मतदान झाले?
-निवडणूक प्रशानसनाच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ संतापले; म्हणाले, ‘एवढ्या उन्हात थांबवलं तर..’
-पुण्यात 1 वाजेपर्यंत 26.48 टक्के मतदान; पुणेकरांच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा