मावळ : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरुर मतदारसंघातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदान प्रक्रियेमध्ये कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले ही आकडेवारी आता समोर आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळाच्या सत्रात चांगले मतदान झाल्याचे दिसते. सकाळी ७ ते दुपारी १ या ६ तासात २७.१४ टक्के मतदान झाले आहे.
पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामध्ये कर्जतमध्ये सर्वाधिक २९.४७ टक्के मतदान झाले. पनवेलमध्ये २६.९३ टक्के, उरणमध्ये २९.०६ टक्के, चिंचवड २६.१२ टक्के, पिंपरी २३.९६ टक्के मतदान झाले आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात २८.०३ टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत २७.१४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या दोन तासात ५.३८ टक्के,दुसऱ्या दोन तासात १४.८७ टक्के तर तिसऱ्या दोन तासात २७.१४ टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक प्रशानसनाच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ संतापले; म्हणाले, ‘एवढ्या उन्हात थांबवलं तर..’
-पुण्यात 1 वाजेपर्यंत 26.48 टक्के मतदान; पुणेकरांच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा
-वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले
-“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती