पुणे : राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर मतदारसंघांची मतदान प्रक्रिया आता सुरु आहे. सकाळी ७ वाजेपासून ते संंध्याकाळी ६ वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरु आहे. मतदानासाठी पुणेकरांची विविध मतदान केंद्रावर गर्दी झालेली दिसत आहे. मतदानासाठी मतदान केंद्रावर भर उन्हात पुणेकर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. मतदान केंद्रावर योग्य नियोजन नसल्याने मतदार नागरिक भर उन्हात ताठकळत उभे असल्याचे पाहून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रशासनावर संतापल्याचे पहायला मिळाले आहेत.
‘प्रत्येक बुथला जाण्यासाठी स्वतंत्र रांग असणं अपेक्षित असताना मतदान केंद्रावरचे अधिकारी एकाच रांगेतून सोडत होते. एवढावेळ मतदानासाठी पुणेकरांना उन्हात थांबवलं तर मतदार मतदान न करताच परत जातील, योग्य नियोजन करा’, असं म्हणत मुरलीधर मोहोळांनी चांगलंच सुनावलं.
शहरातील पौड रोडवरील एमआयटी शाळेतदेखील मतदानासाठी गर्दी झाली होती. याचवेळी मुरलीधर मोहोळ मतदान केंद्राजवळ पोहचले आणि त्यांनी ही गर्दी पाहिली. या ठिकाणी ४ पोलींग बुथ होते. मात्र एकच मोठी रांग लागली होती आणि अनेक नागरिक उन्हात उभे राहिले होते. हा सगळा प्रकार पाहून मुरलीधर मोहोळ चांगलेच संतापले. अनेक निवडणूक प्रशासक बुधवर काम करत होते. मोहोळांनी हा सर्व प्रकार पाहून ४ बुधला जाण्यासाठी ४ वेगवेगळ्या रांगा केल्या आणि निवडणूक प्रशासनाला योग्य नियोजन करण्यासाठी खडसावले.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात 1 वाजेपर्यंत 26.48 टक्के मतदान; पुणेकरांच्या मतदान केंद्राबाहेर लांब रांगा
-वाघेरेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार; मतदानाच्या दिवशी गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरले
-“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती
-७०० रुपयांचे आंबे मिळणार ३०० रुपयांत, फक्त करा मतदान; पहा पुण्यात कुठे मिळणार ही भन्नाट ऑफर