मावळ : लोकसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी उमेदवारांना मोटारीवर पक्षाचा झेंडा अथवा पक्षाचे चिन्ह लावण्यास सक्त मनाई असतानाही मावळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी आपल्या गाडीवर निवडणूक चिन्ह लावून फिरता असल्याने वाघेरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संजोग वाघेरे यांनी आपल्या गाडीवर शिवसेनेचे मशाल हे निवडणूक चिन्ह लावून फिरल्याचा दावा वाघेरे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या संदर्भात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
‘महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे मोटारीवर मशाल या निवडणूक चिन्हाचे स्टिकर लावून मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. हा मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून निवडणूक आचारसंहितेचा उघड- उघड भंग आहे’, असे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या लेखी तक्रारीमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“कर्तव्य पार पाडल्याशिवाय अधिकार मिळत नाही” असं म्हणत सोनाली कुलकर्णीने केली जनजागृती
-७०० रुपयांचे आंबे मिळणार ३०० रुपयांत, फक्त करा मतदान; पहा पुण्यात कुठे मिळणार ही भन्नाट ऑफर
-धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?