पुणे : चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान उद्या सोमवारी १३ मे रोजी पार पडणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुणे, शिरुर आणि मावळ मतदारसंघातील मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देखील विशेष पाऊलं उचलली आहेत. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली आहे.
“पुणे जिल्ह्यातील मावळ, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतदान १३ मे रोजी सोमवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत होणार आहे. यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. पिण्याचे पाणी, सावलीची जागा, वेटिंगरुमची व्यवस्था, वृद्ध वयस्कर मतदारांसाठी वाहतूकीची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे”, अशी माहिती सुहास दिवसे यांनी दिली आहे.
मतदार जेव्हा मतदान करण्यासाठी जातो तेव्हा मतदानाची गुप्तता राखणं हे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे कोणत्या मतदाराने मतदान करातानाचे कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट किंवा शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी असा गुन्हा घडतो त्या ठिकणी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही प्रशासनाकडून कारवाई केली जाते. त्याचबरोबर मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतरावर कोणीही मोबाईल घेऊन जाणे बंधनकारक आहे. मतदान करताना मोबाईलचा वापर करु नका, अशा माहिती दिवसे यांनी दिली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईमध्ये ४ कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर १०० मिनिटात कारवाई केली जाते. तसेच आचारसंहिता भंगाच्या काही बोगस तक्रारी देखील येतात. निवडणुकीच्या दिवशी काही घटना झाल्यास तत्काळ भरारी पथकाकडून कारवाई केली जाईल. गेल्या ६ महिन्यांपासून आम्ही तयारी करत आहोत. जिल्ह्यात ८३ लाख मतदार आहे तर आता ३ मतदारसंघात ६० लाख पेक्षा जास्त मतदार आहेत. पुणेकर सर्व गोष्टीमध्ये पुढे असतात मतदानाला देखील मागे मागे राहू नका, असे आवाहनही यावेळी सुहास दिवसे यांनी केले आहे..
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल
-‘बजरंगी भाईजान’ची मुन्नी ‘हिरामंडी’मधली आलमजेब; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
-Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत
-पुणेकरांना पाणी कपात; बारामतीला मात्र नियोजनापेक्षा जास्त पाणी
-मतदानाच्या दिवशी पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, तब्बल ५ हजार पोलीस असतील तैनात, वाचा…