Hiramandi : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीली भन्सालीचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतात. आताबे संजय भन्साली यांची ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ ही प्रदिर्शित झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात मुन्नीची भूमिका साकारलेली अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा आता मोठी झाली आहे. हर्षालीचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधले आहे. हर्षाली सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. हर्षाली तिच्या इन्स्टाग्रावर विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये तिने ‘हिरामंडी’मधील आलमजेब बनून परफॉर्म केल्याचे दिसत आहे. तिचा हा परफॉर्मन्स नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे.
हर्षालीने ‘हिरामंडी’मधील आलमजेबसारखा लूक करुन त्याच सीरिजमधील एका गाण्यावर तिने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमधील तिचे हावभाव, अभिनय आणि अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. इतकंच काय तर काहींनी थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना त्यांच्या आगामी चित्रपटात हर्षालीला भूमिका देण्याचा सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
‘हिरामंडी’मध्ये भन्साळींची भाची शर्मिन सेहगल हिने आलमजेबची भूमिका साकारली आहे. मात्र याच भूमिकेमुळे तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. शर्मिनच्या चेहऱ्यावर काही हावभावच दिसत नाहीत, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्याविरुद्ध हर्षालीने या गाण्याच्या व्हिडीओत सुंदर अदा दाखवल्या आहेत, असे एका नेटकऱ्यांने लिहिले आहे. ‘आलमजेबची भूमिका तूच साकारायला पाहिजे होतीस’, असं एकाने लिहिलं. तर ‘संजय लीला भन्साळींची पुढची अभिनेत्री’, असे आणखी एका नेटकऱ्याने म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Mother’s Day : संजय दत्त ‘मदर्स डे’च्या दिवशी भावूक; आईची ‘ती’ इच्छा अधुरी राहिल्याची आजही खंत
-पुणेकरांना पाणी कपात; बारामतीला मात्र नियोजनापेक्षा जास्त पाणी
-मतदानाच्या दिवशी पुण्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त, तब्बल ५ हजार पोलीस असतील तैनात, वाचा…
-चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; शेवटच्या टप्प्यात महायुतीचाच बोलबाला
-‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही, पण संधी मिळाली तर ती सोडत नाही’- देवेंद्र फडणवीस