पुणे : राज्य लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्यावर येऊन ठेपले आहे. सोमवारी १३ मे रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभेचे मतदान पार पडत आहे. मतदान प्रक्रिया सुरळित पार पडण्याच्या उद्देशाने शहरात मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पुणे शहर परिसरामध्ये ५ हजार पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे २ हजार जवान, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या तुकड्या, तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुण्यातील शांततेत पार पाडणे आणि कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी शहर, तसेच शहरातील इतर मतदान केंद्रांच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ४ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ९ पोलीस उपायुक्त, १७ सहायक आयुक्त, ६४ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २९६ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, तसेच ५ हजार ५८४ पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे २ हजार जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) २ तुकड्या, केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ३ तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; शेवटच्या टप्प्यात महायुतीचाच बोलबाला
-‘आम्ही घर, पक्ष फोडत नाही, पण संधी मिळाली तर ती सोडत नाही’- देवेंद्र फडणवीस
-Pune | पुणेकरांनो, दाखवा वोट केलेलं बोट अन् मिळवा सूट; स्विगीची भन्नाट ऑफर
-राज ठाकरेंचा फतवा अन् पुण्यात वातावरण पेटले! सोशल मीडियावर “आमचं ठरलंय”चा ट्रेंड; फायदा कुणाला?
-‘मी चुकलो, मला माफ करा, पण आता ती चूक…’; भर पावसात का मागितली अजितदादांनी माफी?