पुणे : चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. आज शिरुर मतदारसंघासाठी सांगता सभा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चाकण येथे भर पावसात सांगता सभा घेतली. या सभेत बोलताना अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
“मागील ५ वर्षांपूर्वी या अजित पवारांनी मोठी चूक केली. डॉक्टर अमोल कोल्हेंना माझ्या मुंबईच्या घरी बोलवून त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. उमेदवारी दिल्यानंतर आणि खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ५ वर्षासाठी माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे करतील. असं वाटलं होतं. पण मी चुकलो, मी अपयशी ठरलो, मला ती चूक मान्य आहे. आता चूक सुधारण्याची वेळ आली आहे. आढळराव पाटलांना निवडून आणा”, असे आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
‘मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आम्हाला पावसात काम करण्याची सवय आहे. चाकणकरांनो आपण शेतकऱ्यांची औलाद आहोत. आपण पावसात भिजल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे पावासाचा आपल्या कामावर फरक पडत नाही. आपल्याला मोठ्या मताधिक्यानं आढळराव पाटलांना निवडून आणायचं आहे. विकासासाठी त्यांना मतदान करा’, असे आवाहनदेखील अजित पवारांनी चाकणमधील मतदारांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्याला सर्वोत्कृष्ट शहर बणवणार, मतदारांचा मतरूपी आशीर्वाद मला मिळेल’; मोहोळांचा विश्वास
-‘ही देशाची निवडणूक, गल्लीतला नाही तर दिल्लीतला नेता निवडायचाय!’ पुण्यातील सांगता सभेत फडणवीस बरसले
-‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा
-‘पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही तर…’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले
-‘१३ तारखेला विरोधकांचा बाजा वाजणार’; बारणेंच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड-शो