पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ शहरातील नातूबाग मैदान येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात पार पडली. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना पुण्याच्या विकासाबाद्दल भाष्य केले आहे. तसेच काँग्रेसवर टीकाही केल्याचे पहायला मिळाले.
काँग्रेस इंडिया आघाडीकडे मुद्दे नसल्याने राज्य घटना बदलण्याचा संभ्रम निर्माण करत आहे. राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व बदलता येत नाहीत. इंदिरा गांधी यांनीच घटनेची मोडतोड केली. ८० वेळा काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली. जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात, असे म्हणत नितीन गडकरींनी इंडिया आघाडीवर टीका केली आहे.
“महाराष्ट्राला गेल्या पाच वर्षांत ५ लाख कोटी रुपये दिले. पुण्यामध्ये वाहतूक कोंडी, प्रदूषण असे प्रश्न आहेत. स्वारगेटसारखी गर्दी विमानतळावर होते. त्यामुळे नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्याला आता नवीन पुण्याची गरज आहे”, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
“गिरीश बापट आणि मुक्ता टिळक प्रचार सभेत नाहीत असे पहिल्यांदाच होत आहे. पुण्याची मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न सुटत नव्हता. संरक्षण विभागाकडून परवानगी घेऊन विमानतळाच्या जागेचा प्रश्न सुटला. तसेच मेट्रोच्या बाबतीतही झाले. या दोन्हीची कामे वेगाने झाली. पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत जाता येईल असा रस्ता करत आहोत. पुणे बेंगलोर मार्गाचे कामही सुरू होणार आहे. पुणे नाशिक, तळेगाव-चाकण-शिक्रापूर डबलडेकर उड्डाणपूल होणार आहे”, असेही नितीन गडकरींनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“फ्लॉप ठरलेल्या कलाकाराला पुन्हा संधी द्यायची नाही…” फडणवीसांचा कोल्हेंवर प्रहार
-पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढचे ४ दिवस वीजांच्या कडाकडासह पावसाची शक्यता
-‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल
-Pune Lok Sabha | शहरातील गुंडांची झाडाझडती; मतदाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची महत्वाची पाऊले