पुणे : लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर मतदारसंघात आज प्रचार तोफा आता थंडावणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरुर मतदारसंघातील भोसरी येथे सभा घेतली. या सभेतून फडणवीसांनी शिवाजी आढळराव पाटलांना मतदान करण्याचे आवाहन केले.
‘‘पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होतील, तेव्हा शहरातील रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना प्रसंगी मोदी यांना भेटू आणि सर्व मिळून हा प्रश्न सोडवू. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करायची आहे. हिंजवडी ते भोसरी-चाकण मेट्रोने जोडणार आहोत. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन मजली उड्डाण पुलाचे नियोजन आहे. पीएमपीच्या ताफ्यात ई-बसची संख्या वाढवून पर्यावरण पूरक काम करायचे आहे. यासाठी महायुतीला साथ द्या”, असं म्हणत फडणवीसांनी आढळरावांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
🕗 8pm | 10-5-2024📍 Bhosari, Pune | रा. ८ वा. | १०-५-२०२४📍 भोसरी, पुणे.
🪷 Bhavya Jahir Sabha for Shirur LokSabha MahaYuti (NCP) candidate Shivajirao Adhalrao Patil at Bhosari, Pune
🪷 शिरूर लोकसभा महायुती (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या… pic.twitter.com/OnkuHDiJ8q— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 10, 2024
“बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आणि शरद पवारांना कळून चुकले की, आता आपले काही खरे नाही. आता राजकीय हवा महायुती आणि अजित पवार यांच्या बाजूने वाहू लागली आहे. आपला पराभव निश्चित आहे. म्हणून ते प्रादेशिक पक्षांची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत”,’ असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. भोसरीमधील या सभेला शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल आदीसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
“नरेंद्र मोदी आमच्या महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. इंडिया आघाडीकडे असा नेताच नसल्याने ते संगीत खुर्ची खेळतील आणि पाच वर्षांत पाच पंतप्रधान देतील. निवडणूक झाल्यानंतर ते नाटके करतात आणि जनतेला विसरतात. ते ‘फ्लॉप’ ठरले आहेत, त्यांना आता पुन्हा संधी द्यायची नाही. कारण ते चांगले कलाकार आहेत. पण, चांगले खासदार होऊ शकले नाहीत”, अशी टीका करत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही हल्लाबोल केल्याचे पहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढचे ४ दिवस वीजांच्या कडाकडासह पावसाची शक्यता
-‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल
-Pune Lok Sabha | शहरातील गुंडांची झाडाझडती; मतदाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची महत्वाची पाऊले
-“शरद पवारांनी राज्यात जातीपातीचं विष कालवलं पण, अजित पवारांना याबाबतीत…”-राज ठाकरे
-…म्हणून पाकिस्तानची भारतात बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही- देवेंद्र फडणवीस