पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. शिरुरमध्ये महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. शिवाजी आढळराव यांच्या भैरवनाथ पतसंस्था तसेच पीडिसीसी बँकेबाहेर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर चांगलाच निशाणा साधल्याचे पहायला मिळाले आहे.
“नौटंकी ढंगात कोल्हे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मी कधी पतसंस्थेत राजकारण आणले नाही. पतसंस्था ही जनतेच्या हितासाठी आहे”, शिवाजीराव आढळराव म्हणाले आहेत. आढळराव पाटील आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. अमोल कोल्हे यांनी नुकतच ते मालिका क्षेत्रातून ५ वर्षांसाठी संन्यास घेणार असल्याचे सांगितले आहे. कोल्हेंच्या या निर्णयावरुनही आढळराव पाटलांनी कोल्हेंवर आगपाखड केली आहे.
“अमोल कोल्हे यांचा हा चुनाव जुमला आहे. ५ वर्षांपूर्वी देखील असच त्यांनी संन्यास घेणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कोल्हे यांच्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. हा त्यांचा चुनावी जुमला आहे”, असा टोला लगावत शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंचा जुना व्हिडिओ देखील पत्रकारांना दाखवला.
महत्वाच्या बातम्या-
-‘शाश्वत जीवनशैलीच्या दिशेने शाश्वत उर्जा स्त्रोतांच्या वापरावर भर’- मुरलीधर मोहोळ
-भर पावसात अजित पवारांचा रोड शो; म्हणाले, “आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय, त्यामुळे…”
-“भविष्यात लढेल की नाही माहीत नाही….” आढळराव पाटील झाले भावूक
-‘तुम्हाला लाज कशी वाटत नाही ठाकरे’; केतकी चितळे ठाकरेंवर का भडकली?