पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत वक्तव्य केले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. पवार यांच्या वक्तव्यावर सर्वच राजकीय पक्ष भूमिका मांडताना दिसत आहेत. यावरु खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रमुख उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली आहे.
‘गेल्या ४० ते ५० वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते चिंतेत गेले असून त्यांनी अनेक लोकांसोबत विचार करुन असं वक्तव्य केले असावे असं मला वाटतं’, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
‘४ जूननंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये टिकून राहायचं असेल तर छोट्या-छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल असं त्यांना वाटत आहे. याचा अर्थ नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे’, अशी ऑफर नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आपण कोणत्याही शूटिंगला जाणार नाही, त्यामुळे पूर्णवेळ लोकांसाठी, विकास कामासाठी”- आढळराव पाटील
-मुस्लिमांची जमीन वाचवली त्यांनाच पाठिंबा; अनिस सुंडकेंसाठी एकवटले मुस्लिम धर्मगुरू
-मतदानाला उरले तीन दिवस; पुण्यात कोण ठरतंय सरस? नेमकी परिस्थिती काय, नक्की वाचा