पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी दिसणारी लढाई वंचित आणि एआयएमआयएम च्या एन्ट्रीने चौरंगी बनली आहे. यामध्येच आता AIMIM उमेदवार अनिस सुंडके यांना मुस्लिम समाजातून पाठिंबा वाढताना दिसत असून मुस्लिम धर्मगुरूंनी पत्रकार परिषद घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेससह भाजप मुस्लिम समाजासाठी काही करत नाही, केवळ मतांसाठी आमचा वापर केला जातो. मात्र अनिस सुंडके यांनी मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी असणारी वफ्फ बोर्डाची जमीन वाचवल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
AIMIM चे उमेदवार अनिस सुंडके यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या वफ्फ बोर्डाची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार केली होती. धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकावल्याची तक्रार नुकतीच पुण्यातल्या मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली होती.
मुस्लिम नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सव्हे नंबर १६६/१ या भूखंडावर चालू असणारे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश दिला आहे. या कामासाठी देण्यात आलेले कमेन्समेन्ट सर्टिफिकेट देखील ताबडतोब रद्द करण्यात यावे. या संबधी केलेली कार्यवाही कळवण्यात यावी, असाही आदेश वक्फ बोर्डाने पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिला आहे. वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, अनिस सुंडके यांनी तक्रार मिळाल्यानंतर दोन दिवसात पाठपुरावा करून मुस्लिम समाजाची जमीन वाचवली. स्थायी समिती अध्यक्ष असताना देखील त्यांनी समाजासाठी अनेक निर्णय घेतले, त्यामुळे समाज त्यांच्या मागे उभा राहणार असल्याचं धर्मगुरूंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मतदानाला उरले तीन दिवस; पुण्यात कोण ठरतंय सरस? नेमकी परिस्थिती काय, नक्की वाचा
-राज ठाकरेंच्या सभेनिमित्त वाहतूकीत बदल; जाणून घ्या कशी आहे वाहतूक व्यवस्था?
-पवारांच्या आमदाराला अजित दादांचं चॅलेंज; म्हणाले, “अरे मंत्री बनायला निघाला पण आता आमदार कसा होतो…”
-पुण्याच्या मैदानात घुमणार नितीन गडकरींचा आवाज, जाहीर सभेतून मांडणार विकासाचा रोडमॅप