पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन गेली १० वर्षे झाली. तब्बल ११ वर्षांनी अखेर निकाल पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी सुरु होती. या हत्या प्रकरणातील ५ आरोपींपैकी ३ आरोपी निर्दोष मुक्त झाले तर २ आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे असे निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप आणि ५ लाख दंड अशी शिक्षा सीबीआयच्या विशेष न्यायालायाने सुनावली आहे.
दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात आरोप सिद्ध होत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. या संपूर्ण निकालाचे हमीद दाभोळकर यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. हत्येचा कट रचलेचा आरोप असलेल्या विरेंद्रसिंह तावडेला निर्दोष ठरवल्यानंतर दाभोळकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
‘या प्रकरणी दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ’, असे हमीद दाभोळकर यांनी सांगितले आहे. डॉ. दाभोळकर यांची शनिवार पेठेतील रामजी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला असून ५ पैकी २ जणांना आरोपी घोषीत करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मतदानाला उरले तीन दिवस; पुण्यात कोण ठरतंय सरस? नेमकी परिस्थिती काय, नक्की वाचा
-राज ठाकरेंच्या सभेनिमित्त वाहतूकीत बदल; जाणून घ्या कशी आहे वाहतूक व्यवस्था?
-पवारांच्या आमदाराला अजित दादांचं चॅलेंज; म्हणाले, “अरे मंत्री बनायला निघाला पण आता आमदार कसा होतो…”
-पुण्याच्या मैदानात घुमणार नितीन गडकरींचा आवाज, जाहीर सभेतून मांडणार विकासाचा रोडमॅप
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३ दिवस जमावबंदी; पुणे पोलीस सहआयुक्तांचे आदेश