शिरुर : चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा चांगालच जोर आला आहे. शिरुर लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरुर मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सभांचा धडाका लावला आहे. या सभांमध्ये अजित पवार विरोधकांवर सडकून टीका करत आहे. प्रत्येक विभागात सभांमधून बोलताना अजित पवार विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच आता अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार अशोक पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना अजित पवार यांनी शिरुरमधील न्हावरे येथे सभेत बोलताना त्यांनी अशोक पवारांना खुलं आव्हान दिलं आहे.
“दिलीप वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रिमंडळात घ्यायला नको होते. आता आपले काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितले. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, अशोक असं असं म्हणत होता. आणि नंतर तो शरद पवारांकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आले आहे.
त्याला साहेबांनी सांगितले की, पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो. अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊ दिलं नाही. मी आता चॅलेंज देतो. यंदा कसा आमदार होतो तेच मी बघतो. मी पण लोकांना सांगेन याची खरी औकात काय आहे ते. आणि आम्ही काय कामं केली” असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवारांना खुले आव्हान दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या मैदानात घुमणार नितीन गडकरींचा आवाज, जाहीर सभेतून मांडणार विकासाचा रोडमॅप
-लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ३ दिवस जमावबंदी; पुणे पोलीस सहआयुक्तांचे आदेश
-‘तेव्हा शरद पवारांच्या अंगावरून साप गेला अन् आठ दिवसांनी…’; सुप्रिया सुळे यांनी सांगितली ‘ती’ आठवण
-मोदींच्या सांगण्यावरुन पुतीनने युद्ध थांबवल्याची जगात मोदींची प्रतिमा; अजित पवारांची स्तुतीसुमने