पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. “रशिया आणि युक्रेनमधे युद्ध सुरु होते, आपली मुले तिथं अडकली होती. मोदींनी पुतीनला फोन लावला आणि आमची मुले सुखरुप यावीत अशी मागणी केली. त्यावेळी पुतीनने आपल्या मुलांना घेऊन निघणाऱ्या विमानांचे टेक ऑफ होईपर्यंत युद्ध थांबवले. अशी प्रतिमा पंतप्रधान मोदींची जगात आहे”, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
“मोदींवर १० वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. मनमोहन सिंग, राजीव गांधी यांच्यावर देखील टूजी स्कॅम, बोफोर्ससारखे आरोप झाले, पण मोदींवर आरोप झाले नाहीत हे त्रिवार सत्य आहे. विरोधक हे सम दुखी असून त्यांची तोंडे चार दिशांना आहेत. जनता पार्टीचे सरकार टिकले नव्हते. यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे समजत नाही. ते म्हणतात की निवडणुकीनंतर सांगू…. तुमच्या काकांनी ठेवलय का?”, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांची खिल्ली उडवली आहे.
🔰09-05-2024 🛣️ शिरूर, पुणे
⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र| व्यापारी मेळाव्यातून लाईव्ह
https://t.co/pIJaCJGMQi— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 9, 2024
अमोल कोल्हे विकासनिधी आणण्यात कमी पडले. एकतर ते विरोधी पक्षात होते. दुसरे की ते कलाकार असल्याने ते बिझी राहिले. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेवर तयार केलेला सिनेमा चालला नाही. त्याचबरोबर कौन बनेगा करोडपती सारखा कार्यक्रम ते घेऊन येणार होते. मात्र, ते विरोधी पक्षात असल्याने त्यांना तो शो मिळाला नाही आणि ते दुखावले. अमोल कोल्हे निवडणुकीला उभे राहणार नव्हते. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला माहित नाही”, असं म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा’; भाजपच्या रासनेंची अनोखी ऑफर
-मुरलीधर मोहोळांसाठी उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
-“मी माझ्या राजकीय जीवनात मोठी चूक केली ती म्हणजे…”; अजित पवार असं का म्हणाले?
-“शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील”; फडणवीसांचा ‘त्या’ चर्चेवरुन फडणवीसांना खोचक टोला