शिरुर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील हायहोल्टेज असलेल्या बारामती मतदारसंघाचं मतदान पार पडलयानंतर आता चौथ्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी सभा घेतली. यावेळी बोलताना अजित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्यातच अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली अन् खासदार केलं ही राजकीय जीवनात मोठी चूक झाल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
“राजेश टोपे सगळ्या आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन शरद पवारांकडे गेले. आम्ही सगळे त्रासलो होतो. शरद पवार आम्हाला म्हणाले राजीनामा देतो. भावनिक राजकारणच मला नको आहे. मी माझ्या राजकीय जीवनात चूक केली ती म्हणजे या ठिकाणाहून अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलं. आता माझी चूक तुम्ही सुधारा”, असे आवाहन अजित पवारांनी केंदूरच्या सभेत मतदारांना केले आहे.
“एक जण म्हणाला अजित पवारांना शरद पवारांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते. अरे बाबा वळल्या असत्या म्हशी. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यात काय? ” असं सणसणीत उत्तर अजित पवारांनी दिल्याचं पहायला मिळालं आहे. “बारामतीत साठीच्या आतील आणि तरुण मंडळी म्हणायचे आम्हाला अजित दादा हवा. पण साठीच्या पुढची मंडळी म्हणायचे, नको राव उतार वयात पवार साहेबांसोबत राहू, असं भावनिक राजकारण केल्यानं विकास होत नाही”, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील”; फडणवीसांचा ‘त्या’ चर्चेवरुन फडणवीसांना खोचक टोला
-“मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही”
-“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल
-विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप