शिरुर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या निवडणुकीतील सर्व मतदारसंघातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील केंदूर येथे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत आहेत. यावेळी अजित पवार चांगलेच चिडलेले पहायला मिळाले. यावेळी अजित पवार विरोधकांवर संतापलेले पाहिले आहे.
या निवडणुकीत कोणीही भावनिक होऊ नका. भावनिक होऊन मतदान करु नका. भावनिक होऊन १२ गावच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी निधी लागणार आहे ही कामं फुकट होत नाहीत. आम्हाला निधी आणण्यासाठी आढळराव पाटलांना सोबत घेऊन जावं लागेल. सगळं करता येत पण पैशाचं सोंग आणता येत नाही. मी सकाळी लवकर उठून कामाला लागतो”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
🔰09-05-2024 🛣️ केंदूर, शिरूर
⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | केंदूर, शिरूर येथे आयोजित महायुतीची जाहीर सभा https://t.co/hYF6E2JZ8e
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 9, 2024
माझ्या भावकीला त्या अशोक पवारला तो कारखाना चालवता आला नाही आता तो माझ्यावर ढकलतोय. त्याला आता कसं सांगावं वाटेल मी कमी पडलो म्हणून.. तो माझ्या नावावर खपवतोय की, अजित पवारने कारखाना बंद पाडला. अरे तुझ्या अंगात नाही दम आणि काय माझं नाव घेतोय. भिमाशंकर कारखाना कसा चालतोय. दिलीप वळसे पाटली नंबर एकचा कारखाना चालवत आहेत. तो पराग खाजगी कारखाना तोही उत्तम चालला आहे. आणि तुम्ही माझी नावं घेता, घोडगंगा बंद पडला मग व्यंकटेशचा कसा काय चालला. जरा डोक्याने विचार करा. खरं बोललं तर राग येतो पण मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार. मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही. चहाचा मिंदा नाहीये”, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर आगपाखड केली आहे.
दरम्यान, अजित पवारांनी या सभेत बोलताना अनेक विकासकामांची माहिती दिली. मतदारसंघातील १२ गावच्या पाणी प्रश्नाबाबत आश्वासन दिली. १२ गावच्या पाणाच्या प्रश्न सोडवण्यासाठी शिवाजीराव आढळाराव पाटलांना मतदान करण्याचे आवाहन अजित पवारांनी केंदूर मधील मतदारांना दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“नुसते डायलॉग बोलत शिरुरच्या मतदारांना भुलवतोय”; शिरुरच्या सभेत अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लबोल
-विकसित पुण्यासाठी मुरलीधर मोहोळांचे संकल्पपत्र! शहराच्या विकासासाठी मांडला रोडमॅप
-मतदारांसाठी मोहोळांकडून प्रभावी यंत्रणा; पुणेकरांनी घेतल्या दोन लाख ‘व्होटिंग स्लीप’