पुणे : लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पुर्ण पडली. त्यानंतर आता सर्व नेते चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत व्यस्त झालेले पहायला मिळत आहेत. पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराने आता आणखीच वेग घेतला आहे. येत्या १३ तारखेला चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान होणार आहे. त्यातच आता मतदानासाठी नागरिकांच्या ‘उत्साहा’बाबत सातत्याने चर्चा होत असतानाच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्क कार्यालयातून आजपर्यंत २ लाख मतदारांनी व्होटिंग स्लिप प्राप्त केल्याची माहिती समोर येते आहे.
‘मोहोळ यांची उमेदवारी सर्वांत आधी जाहीर झाल्याने योग्य वेळी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करता आली’, असे प्रचार समन्वयक निलेश कोंढाळकर यांनी सांगितले. “निवडणूक आयोगाच्या डेटाबेसनुसार, ऑनलाईन आणि ऑफलाईन व्होटिंग स्लिप मिळविण्यासाठी आम्ही महिनाभरापूर्वीच विशेष हेल्पलाईन सुरू केली. तसेच मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सर्व प्रचार साहित्यावर क्यूआर कोड छापण्यात आला. पुण्यातील नागरिक मतदानासाठी उत्सुक असून आणि मतदार स्लिप मिळवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. हेल्पलाईनवर संपर्क करीत, कार्यालयात प्रत्यक्ष येऊन स्लिप घेऊन जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही मोठे आहे. गेल्या ३० दिवसांत या यंत्रणेतून किमान दोन लाख नागरिकांनी स्लिप घेतल्या आहेत.”,असंही कोंढाळकर म्हणाले आहेत.
मतदानाला आता अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने आता घरोघरी जाऊन मोबाईल प्रिंटरच्या आधारे स्लिप वाटपाचे कार्य सुरू असून त्यासाठी दोन हजारांहून अधिक प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज काम करीत असल्याचे कोंढाळकर यांनी सांगितले.
कोथरूडमधील ३८ हजार मतदारांची नावे वगळली?
व्होटिंग स्लिपसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात संपर्क साधणाऱ्या अनेक नागरिकांना आपले नाव मतदारयादीत नसल्याचे लक्षात येत आहे. गेल्यावेळेस मतदान केलेल्या कोथरूडमधील सुमारे ३८ हजार मतदारांची नावे यावेळेस वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाने यादीतील नाव, छायाचित्र, पत्ता इत्यादींसंदर्भात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या आवाहनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क गमवावा लागत आहे, अशी हळहळ राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे. याविषयी निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दत्तात्रय भरणेंची मतदान केंद्रावर शिवीगाळ; व्हिडीओ व्हायरल, वाचा भरणे काय म्हणाले?
-बारामती मतदारसंघातून मतदान करताना ईव्हीएमवर ‘कमळ’ चिन्ह नाही म्हणून आजोबा आक्रमक
-‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
-Baramati | निवडणुकीत पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवार म्हणाले, मी..
-“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील