बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीचे आज मतदान पार सुरु आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदारसंघातीस मतदार आपली जाबाबदारी पार पाडत आहेत. त्यातच संपूर्ण देशाचे या मतदारसंघाच्या लढतीकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये ही मुख्य लढत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या या लढतीकडे संपूर्ण देशाच्या नजरा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बारामती मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर सुप्रिया सुळे तर महायुतीच्या घड्याळ या चिन्हावर सुनेत्रा पवार हे चिन्ह ईव्हीएमवर आहेत. त्यातच एका वृद्ध मतदाराने वोटिंग मशिनवर कमळाचे चिन्ह दिसत नाही म्हणून मतदान केंद्रावर चांगलाच गोंधळ घातल्याचे पहायला मिळाले आहे.
गेल्या काही महिन्यात राज्याच्या राजकारणात अशी उलथापालथ झाली आहे की, राज्यातील अनेक सर्वसामान्य नागरिकांना राजकारणात नेमकं काय सुरु आहे याचा थांगपत्ताच नाही. अनेक नागरिक हे सांंगिव मतदान करतात. काहींना क्वचित तरी माहिती असते. मात्र पारंपारिक भाजपचे मतदार असलेले एक आजोबा ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह नाही म्हणून चांगलेच संतापले होते. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. बारामती लोकसभा मतदारसंघामधून या आजोबांना मतदान करायचे होते मात्र त्यांना कमळाच्या चिन्हावर मत द्यायचे होते. पण त्या मशिनवर आजोबांना कमळ चिन्ह दिसले नाही म्हणून आजोबांनी मतदान केंद्र डोक्यावर घेतल्याचं पहायला मिळालं.
अरे नही भाई, महाराष्ट्र में लोग पोलिंग बूथ से वापीस जा रहे है कमल का फुल नही मिल रहा है वोटिंग मशीन में
धायरी फाटा (पुणे) बारामती 🤔😂😂😂 pic.twitter.com/mmz0jCDykb— gdRathod (@gajanan_ra55704) May 7, 2024
बारामती मतदारसंघामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, खडकवासला हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. तसेच भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस आणि बावधन बु. ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान,भुकूम, भूगाव, लवळे हा भाग येतो. त्यातच खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे, खडकवासला, खेड, शिवापूर, बिबवेवाडीचा काही भाग या शहरी भागात येतो. म्हणजे एकूण काय तर बारामती मतदारसंघातून या आजोबांना मतदान करायचे असल्याने ईव्हीएमवर कमळाचे चिन्हावरुन कोणताच उमेदवार निवडणूक लढवत नाही. आजोबांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मराठी नॉट वेलकम’ म्हणणाऱ्यांवर रेणुका शहाणे आक्रमक; निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
-Baramati | निवडणुकीत पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवार म्हणाले, मी..
-“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील
-बारामतीत मोठा ट्वीस्ट: सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी; चर्चेला उधाण
-“अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये अन् काढ मिशा”; अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना सणसणीत उत्तर