मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये मराठी माणसांसोबत दुजाभाव केल्याच्या घटना समोर आल्या. मुबईतील एका कंपनीने तर चक्क नोकरी असूनही मराठी उमेदवारांना अर्ज करण्यासा परवानगी नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. यावरुन मराठी माणसांच्या मनात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईसह राज्यभरात या कंपनीच्या विरोधात आक्रमकता व्यक्त करण्यात आली त्यानंतर कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. या सर्व घटनेवर आता बॉलिवूडमधील मराठी अभिनेत्री रेणुका शहाणेने पोस्ट केली आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणेने ट्विटरवर मराठी माणसांसोबत झालेल्या दुजाभावावर संताप व्यक्त केला आहे. रेणुकाची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या वातावरणातच रेणुका शहाणेने मराठी माणसांसोबत दुजाभाव करणाऱ्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मतदान करु नका असे स्पष्ट आवाहन केले आहे.
काय आहे रेणुका शहाणेंच्या पोस्टमध्ये?
“मराठी “Not Welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका”, असे रेणुका शहाणे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
मराठी “not welcome” म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका 🙏🏽
मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका 🙏🏽
ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला…— Renuka Shahane (@renukash) May 7, 2024
तसेच,कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे, असे देखील रेणुका शहाणे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati | निवडणुकीत पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजित पवार म्हणाले, मी..
-“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील
-बारामतीत मोठा ट्वीस्ट: सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी; चर्चेला उधाण
-“अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये अन् काढ मिशा”; अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना सणसणीत उत्तर
-‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार’; मुरलीधर मोहोळांचा पुणेकरांना शब्द