बारामती : राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघाचेही आज निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार आणि महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज बारामती येथील काटेवाडी येथे मतदान केले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भोरमध्ये पैसे वाटपाचा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि रोहित पवारांनी केलेल्या आरोपांंवर प्रतिक्रिया दिली आहे.
भोरमध्ये अजित पवार गटाकडून पैसे वाटप करण्याचा करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यासोबतचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम आहे. मी आतापर्यंत सात विधानसभेच्या आणि एक लोकसभेची निवडणूक लढली आहे. आतापर्यंत असे प्रकार कधी केले नाहीत. कारण नसताना विरोधकांनी बगलबच्चे असे माझ्यावर आरोप करत आलेले आहेत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“मी त्याला फार महत्व देत नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे स्कॉड असतात. पोलीस असतात. निरिक्षक असतात. तरहीदेखील ते आमच्यावर आरोप करत आहेत. तसेच आरोप मी देखील त्यांच्यावर करु शकतो. त्यांनी ही निवडणूक योग्य प्रकारे हाताळली नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जातेय, याला….”- आढळराव पाटील
-बारामतीत मोठा ट्वीस्ट: सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी; चर्चेला उधाण
-“अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये अन् काढ मिशा”; अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना सणसणीत उत्तर
-‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार’; मुरलीधर मोहोळांचा पुणेकरांना शब्द
-मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार