बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान पार पडत आहे. त्यातच देशातील हॉटस्पॉट असलेल्या बारामती मतदारसंघात सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या आहेत. या घडामोडीमुळे राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
अजित पवार आणि त्यांची आई काटेवाडीत आहेत, त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे एकट्याच काटेवाडीत पोहोचल्या असल्याची माहिती आता समोर आली आहे. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी मतदान केले आणि अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी पोहचल्या आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असताना सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सुप्रिया सुळे हे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्रातिनिधीक आहे. कारण या भेटीचा परिणाम नक्कीच मतदारांवर होईल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये अन् काढ मिशा”; अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना सणसणीत उत्तर
-‘जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार’; मुरलीधर मोहोळांचा पुणेकरांना शब्द
-मुरलीधर मोहोळांसाठी राज ठाकरेंची पुण्यात जाहीर सभा; ‘या’ तारखेला ‘राज’ आवाज घुमणार
-“त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचाय”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
-‘ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस’; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा…