पुणे : मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ मावळमध्ये प्रचार मेळावा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कोणाची हे सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे ती नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात. त्यांच्या विचारांचे नाही. देशाला मजबूत नेतृत्व हवं आहे. उद्धव ठाकरे यांना विचारणार कोण? त्यांना तर राहुल गांधी यांच्या समोरच मुजरा करायचा आहे. या व्यतिरिक्त कुठलीही भूमिका त्यांना यापुढे मिळणार नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे.
🕡 6.25 pm | 6-5-2024 📍 Kharghar, Raigad.
LIVE | मावळ लोकसभा महायुती (शिवसेना) उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर, रायगड येथे जाहीर सभा@BJP4Maharashtra @MPShrirangBarne#Raigad #ModiJarooriHai #PhirEkBaarModiSarkar https://t.co/Pu0HDFdVK0
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 6, 2024
“वैश्विक प्रकारचं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. ही गल्लीची निवडणूक नाही, दिल्लीची निवडणूक आहे. आपल्याकडे जे नेते येत आहेत ते गल्लीचं भाषण करत आहेत. गद्दार, खुद्दार, खोके, टोके, बोके, त्याच्या पलीकडे जात नाही. श्रीरंग बारणेंवर ते आरोप करत आहेत. गद्दार म्हणत आहेत. पण बारणे हे शिवसेनेतच आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“माझा त्यांना सवाल आहे. तुम्ही जो उमेदवार दिला, तो कोणत्या शिवसेनेत पैदा झाला? तिथं खुद्दारी चालते, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी राहिलो तर गद्दारी. त्यांच्या विचाराशी गद्दारी कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं. ज्या दिवशी काँग्रेससोबत अलायन्स करण्याची वेळ येईल. माझ्या शिवसेनेचे दुकान मी बंद करेन. त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले. त्याच दिवशी स्वाभिमानी शिवसैनिकांनी ठरवलं आता तुमच्यासोबत राहणार नाही”, असं म्हणत शिवसेना ही फक्त शिंदेंचीच असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘ब्लाउज काढून तुझी ब्रा दाखवायला हवीस’; दिग्दर्शकाच्या मागणीनंतर माधुरीने काय उत्तर दिले, वाचा…
-सावधान!! उन्हाळ्यात सतत फोन हिट होऊन बंद पडत आहे का? मग, वापरा या टिप्स, अन्यथा…
-Voting Day | मतदानाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील बाजार बंद; पहा काय काय मिळणार?