पुणे : राज्यातील सर्वात चर्चेचा असणाऱ्या शिरुर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत आहे. आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तू-तू मै-मै सुरु आहे. अमोल कोल्हे यांच्या दावे प्रतिदावे आणि उत्तर प्रत्युत्तर सुरुच असल्याचं दिसत आहे. दोन्हीही नेते एकमेकांना वेगवेगळे चॅलेन्ज देताना दिसत आहे. त्यावरुन आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर चांगलाच निशाणा साधला आहे.
‘मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखला आहे. मी उत्तरं देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात. मी यापुढं कोल्हेंना प्रतिउत्तर देणार नाही’, असा गंभीर आरोप आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर आढळराव पाटलांनी केला आहे.
‘शिरूर लोकसभेतील प्रश्न संसदेत मांडताना आढळरावांनी १५ वर्षे केवळ त्यांच्या कंपनीचं हित जोपासलं’, असा आरोप अमोल कोल्हेंनी केला आहे. यावरुनही आढळराव पाटील चांगलेच संतापले आहेत. ‘अमोल कोल्हेंनी आरोपांचे पुरावे द्यावे, मी लोकसभेतून माघार घेतो अन्यथा त्यांनी निवडणुकीतुन माघार घ्यावी’. आढळराव पाटलांनी केलेलं हे आव्हान कोल्हेंनी स्वीकारलं होतं.
‘अमोल कोल्हेंचा ८० टक्के खासदार निधी परत गेला’, असा आरोप आढळराव पाटलांनी केला आहे. आता आढळरावांनी याचे पुरावे द्यावेत अन्यथा लोकसभेच्या रिंगणातून माघार घ्यावी, असं प्रतिआव्हान दिलं आहे. कोल्हे आणि आढळराव पाटील यांच्यात आव्हान प्रतिआव्हानांचा खेळ सुरु होता. त्यानंतर आढळराव पाटलांनी प्रत्युत्तर देताना अमोल कोल्हेंवर गंभीर आरोप केला आहे. आता अमोल कोल्हे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-प्रियांकाचा पती निक जोनस गंभीर आजाराच्या विळख्यात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती..
-‘मोदी सरकारनेच देशाला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं! नवे शैक्षणिक धोरण क्रांती घडवेल’ – सीतारामन
-बारामतीत अजितदादांचं भाषण अन् मधेच बच्चू कडूंचा फोन; मग अजितदादा काय म्हणाले?
-मोदी-गांधींच्या सभेनंतर पुण्यात ओवैसींची तोफ धडाडणार! राजकीय वातावरण ढवळून निघणार
-“तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”; रोहित पवारांचं अजितदादांना आव्हान