Entertainment news : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पॉपस्टार पती निक जोनास रोजच चर्चेत असतात. सध्या निक जोनास त्याच्या कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. अशातच गायकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. निक जोनास आणि त्याच्या भावांनी मेक्सिकोमध्ये आयोजित होणारे शो पुढे ढकलले आहेत आणि त्यामागे गायकाचा धोकादायक आजार हे कारण सांगण्यात आले आहे.
पॉपस्टार निक जोनसने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्याने सांगितले की तो अनेक दिवसांपासून आजारी आहे आणि यामुळे त्याला त्याचा कॉन्सर्ट टूर पुढे ढकलावा लागत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये निक म्हणतो, ‘हॅलो गाईजमध्ये मी निक आहे. आज माझ्याकडे एक बातमी आहे जी अजिबात मजेदार नाही, परंतु तुम्हाला सांगणे खूप महत्वाचे आहे.
View this post on Instagram
निकने पुढे सांगितले, ‘तो धोकादायक इन्फ्लूएंझा ए विषाणूच्या विळख्यात आला आहे. गायक पुढे सांगतो, ‘काही दिवसांपूर्वी मला काहीतरी विचित्र वाटू लागलं, जेव्हा मी जागा झालो तेव्हा माझा आवाज येत नव्हता आणि त्या रात्री मी कॉन्सर्टचा सराव करत होतो. गेल्या दोन-अडीच दिवसांत माझी प्रकृती हळूहळू खालावत गेली आहे. मला खूप ताप, अंगदुखी आणि घसा दुखत आहे.’
निक जोनासने व्हिडिओच्या शेवटी सांगितले की, हे सर्व शेअर करताना मला अजिबात चांगले वाटत नाही. तो म्हणतो, “तुम्हांला निराश करणे मला अजिबात आवडत नाही. तुम्ही लोक आम्हाला सपोर्ट करण्यासाठी खूप काही करता आणि मला माहीत आहे की अनेकांनी प्रवासही केला आहे, पण मला शो रद्द करावा लागला आणि त्याबद्दल मला खूप खेद वाटतो.”
महत्वाच्या बातम्या-
-‘मोदी सरकारनेच देशाला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं! नवे शैक्षणिक धोरण क्रांती घडवेल’ – सीतारामन
-बारामतीत अजितदादांचं भाषण अन् मधेच बच्चू कडूंचा फोन; मग अजितदादा काय म्हणाले?
-मोदी-गांधींच्या सभेनंतर पुण्यात ओवैसींची तोफ धडाडणार! राजकीय वातावरण ढवळून निघणार
-“तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”; रोहित पवारांचं अजितदादांना आव्हान
-“कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलीय, आढळराव पाटील नक्की विजयी होतील” -आमदार तुपे