पुणे : राज्यातील पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोहोळांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आमने-सामने आहेत. त्यामुळे ह निवडणूक तिहेरी होणार आहे. त्यातच ‘एमआयएम’चे उमेदवार अनीस सुंडके हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात अनीस सुंडके यांनी एक दावा केला आहे.
‘राज्यात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’च्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत पक्षाची शहरातील ताकद दिसेल,’ असा दावा अनीस सुंडके यांनी केला आहे. अनीस सुंडके यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ७ मे रोजी पुण्यात सभा आयोजित केली असल्याचं सुंडके यांंनी सांगितलं आहे.
“विधानसभा, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासून काम सुरू केले आहे. पुणे शहरात ‘एमआयएम’चा एक आमदार आणि महापालिकेत ३० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांशी आतापासून संवाद साधण्यास सुरुवात केली आहे”, असे अनीस सुंडके यांनी म्हणाले आहेत.
महयुतीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर पुण्यातील वातावरण महायुतीच्या बाजुनेच झुकले असल्याचे चित्र पहायला मिळत होते. त्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेलाही पुणेकरांनी प्रतिसाद दिला. भाजपविरोधी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना फटका बसणार आहे.
बहुसंख्य मुस्लीम मतदार हा काँग्रेसला मतदान करण्यास प्राधान्य देतो, असे निरीक्षण आहे. पण, ‘एमआयएम’च्या एन्ट्रीमुळे त्यावर परिणाम होणार आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मानणारा अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाज हा मोठ्या प्रमाणात वसंत मोरे यांच्या पारड्यात मतदान टाकाणार आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम काँग्रेसच्या उमेदवारावर होईल, असेही राजकीय जाणकारांचा दावा आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्यांना…”; रोहित पवारांचं अजितदादांना आव्हान
-“कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलीय, आढळराव पाटील नक्की विजयी होतील” -आमदार तुपे
-‘मी कामाचा माणूस आहे, लवकरच बारामतीचं चित्र बदलून टाकेल’; अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द
परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”