बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यात आला आहे. दौंड तालुक्यात महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंड येथे जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिकांना मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
“आमचं कुटुंब फोडलं. आमचा एक नेता पळून नेला आणि इथं उभं केलं. त्यांना वाटत होतं की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण शरद पवारसाहेबांनी राज्यात ५४ सभा घेतल्या. अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल. तुम्हाला येऊन धमक्या देत आहेत त्याकडे लक्ष देऊ नका”, असे आव्हान रोहित पवारांनी अजित पवारांना भर सभेत दिले आहे.
“अजितदादा जर तुम्ही पवारसाहेबांना वडील म्हणत होतात. मग लोकांना वाटत आहे की, तुम्ही वडिलांचे झाले नाहीत, तर जनतेचे काय होणार? ऊसाची चिंता करू नका. एकाचही ऊस मी शिल्लक ठेवणार नाही. उद्या पवार साहेबांचा पालकमंत्री असणार आहे. पवार साहेब तुमच्या पाठीशी भक्कपणे उभे राहतील. तुम्ही अडचणीत होतात म्हणून सोडलं. मलाही एखादं पद भेटलं असतं. कारवाई झाली नसती पण गेलो नाही. आपण सर्व साहेबांसोबत आहोत”, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलीय, आढळराव पाटील नक्की विजयी होतील” -आमदार तुपे
-‘मी कामाचा माणूस आहे, लवकरच बारामतीचं चित्र बदलून टाकेल’; अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द
परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”
-शरद पवार गटाला मोठा धक्का; मतदानापूर्वी रोहित पवारांचे कट्टर समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत