पुणे : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे. त्यातच शिरुर निवडणुकीत महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीकडून डॉ. अमोल कोल्हे यांच्यात मुख्य लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हडपसर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी आज पुणे लोकलशी संवाद साधला.
“आढळराव पाटलांचा प्रचार करताना कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. कार्यकर्ते आणि नागरिक हे उत्फुर्तपणे उमेदवाराच्या पाठिशी उभे आहेत. शहरी भागात विकासाला महत्व दिलं जातं. त्यामुळे मतदार हे विकासाच्या गोष्टींनाच महत्व देतात असा आमचा अनुभव आहे. मतदान करताना मतदाराची मानसिकता ही स्थैर, सुरक्षा आणि विकास या त्रिसुत्रीवर असते. शहरी मतदार तसाच विचार करुन मतदान करतो. कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतलीय, आढळराव पाटील नक्की विजयी होतील”, असा विश्वास चेतन तुपे यांनी व्यक्त केला आहे.
अमोल कोल्हेंनी विकासाच्या मुद्द्यावरुन हडपसरची जनता माझ्या पाठिशी असले असा दावा केला आहे. याबाबत बोलताना चेतन तुपे म्हणाले की, “प्रत्येकाची प्रचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक जण आपल्या विचारानुसार पॅटर्न ठरवत असतो. आमच्या दृष्टीने ही निवडणूक सर्वसामान्यांच्या हिताची, विकासाची आहे, आम्ही त्याच मुद्द्यावर पुढे जात आहोत”, असेही चेतन तुपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘मी कामाचा माणूस आहे, लवकरच बारामतीचं चित्र बदलून टाकेल’; अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द
परभणीच मतदान होताच महादेव जानकर बारामतीत अॅक्टीव्ह, म्हणाले “दादांनी मला….”
-शरद पवार गटाला मोठा धक्का; मतदानापूर्वी रोहित पवारांचे कट्टर समर्थक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
-नाराळाच्या तेलाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?