पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यातील महत्वाचा मतदारसंघ असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्यात मुख्य लढत आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मोठा मानपान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी शरद पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश देत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर आणि एकूणच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक हे राम शिंदे यांच्याकडे गेल्याचे अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी अक्षय शिंदे हे रोहित पवार यांच्या सोबतच होते. त्यानंतर आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत.
कोण आहेत अक्षय शिंदे?
अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता.
महत्वाच्या बातम्या-
-नाराळाच्या तेलाचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?
-मोहोळांची ताकद वाढली; अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा
-आढळराव पाटलांसाठी महेश लांडगे यांची रणनीती, भोसरीत जनसंवाद मेळाव्याचा धडाका!
-दिल्लीचं पथक मावळमध्ये आलंच नाही; बारणेंनंतर आता भाजपकडूनही दावा
-हिंजवडीत ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; पैशाचे अमिश दाखवून केला जात होता वेश्या व्यवसाय