Coconut Oil : नारळाचे तेल हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते. भारतात नारळ तेलाची कमतरता नाही. यामुळे देशात नारळ तेलाचा देशात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नारळ तेल हे फायदेशीर असल्याचं आरोग्य तज्ञांनी देखील सांगितले आहे. नारळ तेलाचा वापर जेवणापासून शरीराच्या त्वचेपर्यंत केला जातो. देशातील प्रसिद्ध न्यूट्रीशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी नारळ तेलाचे फायदे सांगितले आहे.
नाराळाच्या तेलामध्ये लॉरिक एसिड गुड कोलेस्ट्रॉल वाढवतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यास मदत करतो. नारळाचे तेल हृदयासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या तेलामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
नारळाच्या तेलात लॉरिक एसिड, मोनोलॉरिनमध्ये एंटीमाइक्रोबियल आणि एंटीवायरल प्रोपर्टीज असतात. यामुळे नारळ तेलाचे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते. त्यामुळे नाराळाचे तेल आपल्याला रोगांशी लढण्यासाठी शरारातील पेशींचा क्षमता वाढते.
नारळाचे तेल त्वचेवर लावले तर आपली त्वचा मॉइश्चुराइज म्हणून करण्याचे काम करते. आपल्या शरीरावर कोणत्याही भागात सूज आली असेल नारळाचे तेल लावले तर सूज वसरते. नारळाच्या तेलामुळे केसांचे पोषण करते. तसेच कंडीशनर म्हणूनही ते काम करते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
महत्वाच्या बातम्या-
-मोहोळांची ताकद वाढली; अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जाहीर पाठिंबा
-आढळराव पाटलांसाठी महेश लांडगे यांची रणनीती, भोसरीत जनसंवाद मेळाव्याचा धडाका!
-दिल्लीचं पथक मावळमध्ये आलंच नाही; बारणेंनंतर आता भाजपकडूनही दावा
-हिंजवडीत ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; पैशाचे अमिश दाखवून केला जात होता वेश्या व्यवसाय
-कसब्यात मोहोळांच्या बाईक रॅलीला मोठी गर्दी! नागरिकांकडून फुलांची उधळण करत स्वागत