पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ लोकसभेत महायुतीमध्ये मोठी खदखद असल्याची चर्चा सध्या सारखीच चर्चा होत आहे. अशातच दिल्लीचं एक पथक मावळ मतदारसंघात आले असल्याची प्रेसनोट महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे टीमने काढली. पण मावळमध्ये अशी कोणतंही पथक आले नसल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे बारणेंकडून का काढण्यात आली असावी याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
श्रीरंग बारणेंचा प्रचार नेमका कसा सुरु आहे, हे प्रत्यक्षात पाहण्यासाठी दिल्लीचं एक पथक मावळ लोकसभेत आलं आहे. याबाबत प्रसारमाध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्रीरंग बारणेंच्या गटाकडून कळण्यात आलं होतं. मात्र, आता ‘मला याबाबतची कल्पना नाही, ते पथक माझ्यापर्यंत आलं नाही’, असं म्हणत बारणेंनी आता सावध भूमिका घेतली होती. बारणेंच्या भूमिकेनंतर भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आता भाजपनेही अशा कोणत्या प्रकारचं पथक आलं नसल्याचं सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारचं भाजपचं किंवा केंद्राचं पथक किंवा नेते येणार असले तर शहराच्या पक्षाच्या अध्यक्षाला कळवलं जातं मात्र आमच्याकडे अशी कोणतीही माहिती आली नसल्याचं भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हिंजवडीत ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; पैशाचे अमिश दाखवून केला जात होता वेश्या व्यवसाय
-कसब्यात मोहोळांच्या बाईक रॅलीला मोठी गर्दी! नागरिकांकडून फुलांची उधळण करत स्वागत
-“२ वेळा बोललात, तिसऱ्यांदा बोलला तर करारा जवाब मिलेगा”; सुप्रिया सुळेंचा इशारा
-पुण्यातील वाहतूकीत ४ मे पासून महत्वाचे बदल; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, कोणता पर्यायी मार्ग?